झेंड्यावर राजमुद्रा वापरणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा सवाल

मुंबई | जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो… असा आवाज गेली 13 वर्ष महाराष्ट्र ऐकत होता. मात्र तो आवाज देणाऱ्या राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलताच भाषणाची सुरूवात देखील बदलली. काल त्यांनी महाराष्ट्रवासियांना संबोधित करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, अशा शब्दांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. पक्षाच्या झेंड्यावर त्यांनी राजमुद्रा आणली आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज यांना सवाल केला आहे.

23 नोव्हेंबरला शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे यांचा स्मृतीदिन असतो. म्हणजे कालच शहाजीराजे यांचा स्मृतीदिन होता. मात्र याच दिवशी ज्यांनी शिवरायांना राजमुद्रा दिली त्या शहाजी राजांचा त्यांच्या स्मृतिदिनी मनसेला विसर पडत असेल तर राजमुद्रा वापरण्याचा अधिकार काय?, असा सवाल मिटकरींनी राज यांना केला आहे.

राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी आपला झेंडा बदलत आपल्या नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केलीये. आता तर भाषणाच्या सुरूवातीवरून राज ठाकरे इथून पुढच्या काळात हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

झेंडा का बदलला याचं कारण देताना माझ्या मनात पूर्वीपासून हाच झेंडा होता. माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता, असं राज म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-