भाजपाच्या सडक्या विचारांचा बुरखा जनताच फाडेल; पवारांची सुरक्षा काढल्यानंतर चाकणकर आक्रमक

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची केंद्र सरकारने सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. जनसामान्यांमधुन आलेल्या लोकनेत्याला तुमच्या सुरक्षितेची गरज नाही, जनतेच्या प्रेमाचं भरभक्कम कवच चहुबाजुंनी आहे. भाजपाच्या सडक्या विचारांचा बुरखा जनताच फाडेल, अशी आक्रमक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

सत्ताबदल होत असतात, सत्ताधारी बदलत असतात पण हे बदल खिलाडु वृत्तीने स्वीकाराले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करताना भाजपा सरकारची मनोवृत्ती अतिशय अस्वस्थ, कुटील आणि दांभिक प्रवृतीची आहे, असं देखील म्हटलंय.

मरणारा मासा तडफतो, हे पुन्हा एकदा दिसलं, असं म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केलंय. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही पवारांची सुरक्षा काढल्यावर भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजूनही सुरक्षा आहे मग शरद पवार यांची सुरक्षा का हटवलीये? असा सवाल रोहित यांनी केंद्र शासनाला विचारला आहे.

महाराष्ट्रात पवारांना झेड सुरक्षा आहे मात्र पवारांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा केंद्राने काढून घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र शासनावर टीकेची झोड उठवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप नेते विनोद तावडे यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले….

-व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होणार नाही म्हणून काम करेल; जयंत पाटलांच्या हळव्या मनाचं दर्शन

-राज ठाकरेंना शिंगावर घ्यायला आम्ही घाबरत नाही; इम्तियाज जलीलांचा एल्गार

-मोदींनी शरद पवारांची सुरक्षा हटवताच रोहित पवार भडकले; म्हणाले…