“अमोल मिटकरी म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं लेकरू”

मुंबई | राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चांगलाच वाद पेटल्याचं दिसत आहे. अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

मम भार्या समर्पयामी या वाक्याचा अर्थ मिटकरींनी यावेळी समजून सांगितला होता. त्यामुळे ब्राह्मण समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात मिटकरींविरूद्ध आंदोलन देखील करण्यात आलं.

अशातच आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते असं वक्तव्य करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे.

अमोल मिटकरी म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं लेकरू, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. अमोल मिटकरींचा होणारा निषेध योग्यच आहे, असंही मेटे म्हणाले आहेत.

मिटकरींनी ज्या प्रकारे कन्यादान झाल्याचं सांगितलं, तसं कन्यादान होत नाही, असंही मेटे म्हणाले आहेत. त्यांना कोणता अर्थ सांगण्यात आला हे माहिती नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खेद देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रकरण लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना पोलिसांकडून नोटीस जारी

  “भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार लागतात”

  “बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर पोहोचू द्या, हे लोक…”

  मोठी बातमी! राणा दाम्पत्यांमुळे मुंबईत मोठा ड्रामा, शिवसेना आक्रमक 

  Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, पाहा काय बदल झाला