मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील – अमोल मिटकरी

मुंबई |  काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या 22 आमदारांनीदेखील आपला राजीनामा दिला आहे. यामुळे मध्यप्रदेशातलं कमलनाथ यांचं सरकार अस्थिर झालं आहे. यावर महाराष्ट्रातलं सरकार देखील लवकरच ढासळेल, असा दावा काही भाजप नेते आणि काही पदाधिकारी करत आहेत. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांना टोला लगवाला आहे.

मध्य प्रदेश मधील राजकीय उलथा पालथ पाहून महाराष्ट्रात अनेकांना सत्तांतराच्या उकळ्या फुटल्यात मात्र त्यांनी काळजी करू नये. इथे पवार साहेबांनी स्थापन केलेलं ‘महाविकास आघाडीचं’ शिस्तीचं सरकार आहे, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

तर मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील, असा सूचक इशारा देताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशात जे झालं तसं काही महाराष्ट्रात होणार नाही. काळजी करू नका. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या आखाड्यात… राज्यसभेसाठी अर्ज दाखल

-“कोरोना आला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने रोज 600 मरतात तरी हेल्मेट का घेत नाही”

-काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

-जरा थांबा… कमलनाथ अजूनही चमत्कार करु शकतात; शरद पवारांना विश्वास

-कोरोना पासून वाचण्यासाठी पंकजाताईंनी दिला हा सल्ला…