धक्कादायक! पुण्यात कोरोनाग्रस्त कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघड

पुणे| एकीकडं कोरोना संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय तर दुसरीकडं पुण्यात कोरोनाग्रस्त कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

कोरोनाग्रस्त कुटुंब ज्या परिसरात राहतय त्या ठिकाणी राहू नका असं म्हणत परिसरातील लोकांकडून कोरोनाग्रस्त कुटुंबाला त्रास दिला जातोय. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाच झाली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

पुण्यातील एका दाम्पत्याला संसर्ग झाल्याचं सोमवारी संध्याकाळी स्पष्ट झालं. हे दाम्पत्य सहलीसाठी दुबई येथे जाऊन आले होते. नायडू रुग्णालयातील विलीगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या या रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने वैद्यकीय नमुन्यांची तपासणी केल्यानंतर या दाम्पत्याला करोना संसर्ग असल्याचे जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या – 

-मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील – अमोल मिटकरी

-शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या आखाड्यात… राज्यसभेसाठी अर्ज दाखल

-“कोरोना आला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने रोज 600 मरतात तरी हेल्मेट का घेत नाही”

-काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

-जरा थांबा… कमलनाथ अजूनही चमत्कार करु शकतात; शरद पवारांना विश्वास