‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा

मंबई | भाजप नेते व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कायम आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात. विरोधी पक्षावर कायम टिका करत असतात. मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या त्यांच्या गाण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात.

अमृता फडणवीस यांनी व्हलेंटाईन दिनानिमित्तआपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या गाण्यात त्या एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून पाहायला मिळत आहे.

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. अमृता फडणवीस यांचंही संगीताप्रति प्रेम आहे. हा दिनाचं औचित्य साधून त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय.

या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांचा नवा लूक पाहायला मिळतोय. या लूकवरुन हाती त्रिशूळ, अंगावर भगवी वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अशा रुपात त्या पाहायला मिळणार आहेत. लॉर्ड शिवा अर्थात महादेवाच्या भक्तीवर आधारित त्यांचं नवं गाणं असणार आहे.

‘मी तुला निवडले आता आणि कायमचे… माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात तू आहेस… हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो… मी माझ्या रुद्र… लॉर्डशिवाला माझी संगीतमय स्तुती अर्पण करते, असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, राजकीय स्थितीवर परखड मत व्यक्त करतानाच विविध नवनवीन गाणी त्या आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत असतात. त्यांच्या गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्या आपलं मत आणि व्यक्तिमत्व टिकवून आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका