हिजाब प्रकरणावर तृप्ती देसाई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….

सांगली | हिजाब वादात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भाष्य केलं आहे. हिजाब वरून जे हिंदू मुस्लिम वातावरण तापलं आहे. ते चुकीचं आहे, असं तृत्पी देसाई यांनी म्हटलं आहे

शाळेत जाताना शाळेचा गणवेश परिधान करणं हेच योग्य आहे. उद्या कोणीही ही उठून काहीही करेल. ज्याला त्याला व्यक्तिगत स्वतंत्र आहे. पण शाळेत नको. असे वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केलं आहे. त्या सांगलीत माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

भ्रूणहत्या विरोधात सरकार किती संवेदनशील आहे. हे दाखवण्याची वेळ आली आहे. एकीकडे बेटी बचाव बेटी पाढाओ मोहीम राबवतात. आणि सांगलीच्या म्हैशाळ मधील प्रकरण मध्ये सरकार वकील नेमता येत नाही. त्याला विलंब लागत आहे. सरकारी वकील नेमलाच पाहिजे आणि या प्रकरणात जे प्रशासकीय अधिकारी दोषी आहेत. त्याच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आण्णा हजारे यांनी वाईन वरून आंदोलन करणार आहेत, याबाबत त्यांना विचारलं असता या वयात आंदोलन करणं हे आश्चर्य कारक म्हणावं लागेल. कारण अण्णानी या दारू बंदी विरोधात चळवळ उभी केली होती. तसेच या सरकारने जनतेची मतं ऐकून निर्णय घेणार असे म्हणाले. पण जनतेतून या वाईन विक्रीला विरोध आहे. सरकारला हा निर्णय माघे घ्यावा लागेल. अशा इशारा त्यांनी दिला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या महिलांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या नाहीत. अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा कश्या असू शकतात. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे.

सरकारने वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. तो चुकीचे आहे. एकविसाव्या शतकात तरुण पिढी व्यसनाधीन सरकारला करायची आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

कोरोनाने हिरावून घेतली बापाची सावली, आता वडिलांच्या आवडत्या IPL टीमकडून खेळणार 

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका