महिलांची सुरक्षा कशी घेतली जाणार? अमृता फडणवीसांचा सरकारला सवाल

पुणे | मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. 27 जानेवारीपासून हा निर्णय संपुर्ण राज्यात लागू होणार आहे. या निर्णयावर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी त्या बोलत होत्या.

मुंबईतील नाईट लाईफविषयी अद्याप काहीही विचार केलेला नाही. यामध्ये महिलांची सुरक्षा कशी घेतली जाणार?, याबाबत विचार करावा लागेल, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आज महिला दिवस-रात्र काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुंबईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  मनसेच्या घेतलेल्या नव्या भूमिकेवर बोलताना म्हणाल्या की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-