“अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है, या शब्दांत अमृता फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देते. हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूने सर्वजण आहेत, याचा आनंद आहे. अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है. भाजपकडे लोक जे आले ते प्रेमाने आलेत. शिवसेनेला आता धडे मिळायला सुरुवात होईल, असं त्या म्हणाल्यात.

हा भाजपच्या स्वतःच्या कर्तृत्वावरील निकाल आहे. भाजप काही महाविकास आघाडी नाही, रडीचा डाव खेळायला, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मात्र शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.

महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणलेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बरंच काही शरद पवारसाहेबांकडून शिकण्यासारखं आहे” 

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

चक्क शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले… 

Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया