अमृता खानविलकर करणार बिग बॉसमध्ये प्रवेश?

मुंबई| आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सध्या अमृता ‘खतरों के खिलाडी 10’ मध्ये दिसत आहे. याच शो निमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने बिग बॉसमध्ये सहभागी न होण्यामागचे कारण सांगितले आहे..

अमृताने नुकताच तिचा खतरों के खिलाडी पर्व 10 या कार्यक्रमातील अनुभव स्पाटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केला. दरम्यान तिला बिग बॉसशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने माझ्या नवऱ्याने हिमांशूने मला त्या शोमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिलेली नाही असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर ऐकून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहे.

यंदाच्या बिग बॉसचे पर्व खूप छान होते. त्यामुळे मी हिमांशू नसताना ते पाहायचे आणि तो येताच क्षणी चॅनेल बदलायचे’ असा खुलासा अमृताने यावेळी केला.

हिमांशू हा खूप वेगळा व्यक्ती आहे. त्याला घरात वादविवाद झालेले आवडत नाहीत आणि मी एका शोमध्ये जाऊन ते करणं फार लांबची गोष्ट आहे असं ती मुलाखतीदरम्यान म्हणाली. अमृताने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-दोन हजारांच्या नोटासंदर्भात अर्थमंत्री सीतारामण यांनी केला मोठा खुलासा!

-…म्हणून नागराज मंजुळेंना पुण्यात शिकत असताना वाटायची भीती

-भास्कर जाधवांनी विचारला थेट शिवसेनेलाच प्रश्न म्हणाले…

-दिल्लीकरांनो काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत- अमित शहा

-विलासराव देशमुखांवर बायोपिक काढणं सोपं नाही- रितेश