दोन हजारांच्या नोटासंदर्भात अर्थमंत्री सीतारामण यांनी केला मोठा खुलासा!

नवी दिल्ली | देशातील सर्व बँकांच्या एटीएममधून 2 हजार रूपयांच्या कमी होणार असल्याचं बोललं जात होतं. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. दोन हजार रूपयांचं सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकानं बँकांना दिले नसल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणे बँकांना दोन हजार रूपयांचं सर्क्युलेशन रोखण्याचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

एका अहवालात देशातील 2 लाख 40 हजार एटीएममधून 2 हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, देशभरातील एटीएममधूल 2 हजार रूपयांच्या नोटा हटवण्यात येणार असल्याच्या चर्चांदरम्यान अर्थमंत्र्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून नागराज मंजुळेंना पुण्यात शिकत असताना वाटायची भीती

-भास्कर जाधवांनी विचारला थेट शिवसेनेलाच प्रश्न म्हणाले…

-दिल्लीकरांनो काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत- अमित शहा

-विलासराव देशमुखांवर बायोपिक काढणं सोपं नाही- रितेश

-सगळं काम अजित पवारच करतायेत… मुख्यमंत्री काहीच करत नाहीत- नारायण राणे