डेल्टाक्राॅननं पुन्हा वाढवलं टेेन्शन! आतापर्यंत ‘या’ देशांमध्ये आढळले नवे रूग्ण

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अशातच आता नव्यानं काळजीत टाकणारी माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा नवा डेल्टाक्राॅन व्हेरियंट समोर आल्यानं संशोधकांसह सर्वांना काळजी लागली आहे. सध्या यावर संशोधन चालू आहे.

डेल्टाक्राॅनची लक्षणं ही ओमिक्राॅन आणि डेल्टा या व्हेरियंटसारखी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या डेल्टाक्राॅनचे काही प्रकरणं ही युरोपीयन देशांमध्ये समोर आली आहेत. प्रामुख्यानं नेदरलॅंड, फ्रान्स, डेन्मार्क या देशांमध्ये डेल्टाक्राॅनचे रूग्ण आढळले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल विभागाच्या प्रमुख मारिया वेन केरखोव्ह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. सध्यातरी डेल्टाक्राॅनचा धोका जास्त नाही.

सध्या या व्हेरियंटनं जनावरांना आपल्या कार्यक्षेत्रात ओढलं आहे. त्यानंतर नागरिकांना देखील या व्हायरसचा धोका आहे, असं मारिया म्हणाल्या आहेत.

जानेवारी 2022 मध्ये पहिल्यांदा डेल्टाक्राॅनचा रूग्ण आढळला होता. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

विशेष अशी कोणतीही लक्षणं सध्या समोर आली नाहीत. सध्या जागतिक आरोग्य संघटना डेल्टाक्राॅनवर अधिक सक्षमपणे काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”