संघपरिवारातील संघटनेकडून शिंदे सरकारला विरोध?; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त मिळाला आहे. आज राजभवनात शिंदे भाजप युती सरकारच्या 18 आमदारांचा शपथविधी पार पडणारे.

भाजप गेले काही दिवस शिवसेेनेतून बंड करुन आलेल्या शिंदे गटाची सतत पाठराखण करत आला आहे. भाजप आणि शिंदे गटाने नेहमीच एकमेकाची भूमिका लोकांना सांगितली. पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न असलेल्या एका संघटनेने या सरकारला विरोध केला आहे. या संदर्भात एक पत्रक जारी करत त्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. त्या पत्राच्या माध्यमातून संघटनेने राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय.

महिना उलटून गेला तरी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नाही, यावर देखील पत्रातून टीका करण्यात आली. संघाच्या वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संघटना आहेत.

त्यातील एक म्हणजे, सहकार भारती संघटना (Shahakar Bharati Sanghatana). राज्य सरकारने 4 ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या एका परिपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यातील सहकारी पतसंस्थांना अंशदान देणे बंधनकारक करण्यासंदर्भात हे परिपत्रक असून त्याचा सहकार भारतीकडून निषेध करण्यात आला आहे.

राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्रातील सर्व सहकारी पतसंस्थांना अंशदान देण्यास बाध्य केले जाणार आहे. त्यामुळे हे अनैसर्गिक असल्याचे सहकार भारतीच्या पत्रातून म्हंटले गेले आहे.

राज्याला महसूल मंत्री नसताना, राज्य सरकार धमकावून, अशा पद्धतीचे परिपत्रक काढून, राज्यातील सहकारी पतसंस्थांना एक भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे संघाच्या संघटनेचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं

टीईटी घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर!

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, वाचा कुणाला संधी मिळणार

“उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही”