पूजा चव्हाण प्रकरणाला गंभीर वळण! पूजाच्या छोट्या बहिणीबरोबर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

बीड | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण प्रकरणी रोज काही न काही नवीन माहीती समोर येत आहे. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका अज्ञात तरुणीने पूजा चव्हाणची बहिण दिव्यांगा चव्हाण हिचा मोबाईल चो.रल्याची धक्कादायक घटणा घडली आहे.

४ मार्चला सांयकाळी दिव्यांगा तिचा मित्र सौरभ कराड याच्याबरोबर परळीतील हणुमान गड परिसरात गेली होती. यावेळी एका अज्ञात तरुणीने दिव्यांगाला अनोळखी नंबरवरुन कॉल केला आणि तुझ्या बहिणीबद्दल बोलायचं आहे, असं सांगून परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ बोलावलं.

यानुसार ४ मार्चला दिव्यांगा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेजवळ गेली. मात्र, या अज्ञात तरुणीने दिव्यांगाला पुन्हा कॉल करुन शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावलं. यावेळी दिव्यांगा फोनवर बोलत असतानाच अचानक समोरुन एक तरुणी तोंडाला स्कार्प बांधून आली आणि तिने दिव्यांगाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला.

दिव्यांगाने आणि तिच्या मित्राने अज्ञात तरुणीचा खूप पाठलाग केला. मात्र, थोड्या अंतरावर गेल्यावर ती तरुणी एका युवकाच्या गाडीवर बसून फरार झाली. सध्या पोलिस या अज्ञात तरुणीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, पूजा चव्हाण टिकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

या प्रकरणामागे संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?”

जाणून घ्या! बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली….

मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पाठवणीवेळी खूप रडणं नवरीला पडलं महागात, घडली ‘ही’ ध.क्कादायक घटना