मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल

मुंबई | कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनला झुगारून वांद्रे पश्चिम येथे हजारोंचा जमाव गोळा झाला. या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यावरून आता अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईचं इटली होणार. पुढे आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असं रंगोलीने ट्विटरवर म्हटलं आहे.

रंगोलीने याआधीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाची स्तुती केली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे, असा टोमणा रंगोलीने मारला होता.

कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला.

 

महत्वाच्या बातम्या –

-घरात दारु कशी बनवावी? लॉकडाऊनच्या काळात गुगलवर ट्रेंड

-भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

-“देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारे आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..”

-केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही पैसे मिळेनात -बाळासाहेब थोरात

-“परदेशातून आलेल्या 30 ते 40 लाख लोकांची चाचणी तेंव्हाच केली असती तर…”