विनय दुबेला मी ओळखत नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई |  आपण विनय दुबेला ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. विनय दुबेला वांद्रे रेल्वे स्थानकावरील गर्दी जमविल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आलेलं आहे.

विनय दुबेचे वडील जटाशंकर दुबे यांनी गृहमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार रूपयांची मदत केली आहे. यानंतर उलट सुलट चर्चेला सुरूवात झाली होती. मात्र देशमुख यांनी आता विनय दुबेला मी ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात एक रिक्षावाला मला भेटायला आला होता. मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नसल्यामुळे त्याने माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा 25 हजार रुपयांचा चेक सुपूर्द केला, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विनय दुबेने उत्तर भारतीयांना चिथावणी देणारी फेसबुक लिहिली होती. जर मजुरांना गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू झाली नाही तर आम्ही आंदोलन करू, असं त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होते. त्यानुसारच त्याच्यावर आता कारावाई झाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल

-घरात दारु कशी बनवावी? लॉकडाऊनच्या काळात गुगलवर ट्रेंड

-भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

-“देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारे आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..”

-केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही पैसे मिळेनात -बाळासाहेब थोरात