पुण्यात मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी सज्ज

पुणे | पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सकाळी दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींची आरती झाल्यानंतर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुकीत तब्बल सात हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात तब्बल सात हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवा बीडीडीएस पथक, शीघ्र कृती दल, वज्र, दंगल नियंत्रण पथक, स्त्रयकिंग फोर्स, तब्बल तीस हजार प्रशिक्षित स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.

दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणरायाचं आज विसर्जन होणार आहे. मोठ्या मनोभावे भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केलेल्या गणरायाला आज अखेर निरोप दिला जाईल.

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-