नवी दिल्ली : आज उद्या म्हणता म्हणता विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यास मुहूर्त मिळाला आहे. येत्या सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जातील. या तारखांची घोषणा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्रासह एकूण तीन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.
याआधी येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी सज्ज- https://t.co/KFyYoc57IU #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
लाडक्या बाप्पाला आज निरोप; कडेकोट सुरक्षा तैनात – https://t.co/bzpmSWU6qg #GanpatiBappaMorya
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
…म्हणून राष्ट्रवादीचे खासदार उदनराजे भोसले शरद पवारांची भेट घेणार! – https://t.co/dH4ZQWgsFr @Chh_Udayanraje @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019