मुंबई | अमरावतीमधील भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका करताना चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे.
फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात शिक्षा दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. ह्या राज्यात जेव्हा माझीच सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय?, असं ते म्हणालेत.
शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजासारखी थोडीफार पुनरावृत्ती होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात शिक्षा दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. ह्या राज्यात जेव्हा माझीच सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय? असं शरद पवार यांनी स्वत: जाहीर करावं आणि त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी. अशी मागणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केली.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरी अचानकपणे आक्रमक आंदोलन केलं आहे.
आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चप्पल फेकीसह दगडफेकही केली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा, म्हणाले…
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला; महाराष्ट्रासह ‘या’ चार राज्यांना अलर्ट जारी
आत्ताची मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते मुंबई पोलिसांच्या ताब्यात
“सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा”