मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या घराबाहेर शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कर्मचाऱ्यांनी पवार यांचं सिल्वर ओक घराबाहेर अचानकपणे आंदोलन केलं आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी घराच्या आवारात घुसखोरी केली आहे. एवढंच काय तर त्यांनी घराच्या आवारात घुसून चप्पल फेक सुद्धा केली आहे.
या हिंसक आंदोलनावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (MP Chhatrapati Udayan Raje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देत असताना त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.
कर्म असतं ना कर्म जे आपण जन्म करतो. प्रत्येक जणाला लागू होतं, तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. यातून कोण वाचत नाही, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
जे आपण या जन्मी कर्म करतो, ते याच जन्मी आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार, असं उदयनराजे म्हणालेत.
बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी”
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा, म्हणाले…
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला; महाराष्ट्रासह ‘या’ चार राज्यांना अलर्ट जारी
आत्ताची मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते मुंबई पोलिसांच्या ताब्यात