पीडितेच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल- गृहमंत्री

मुंबई | हिंगणघाट घटनेत युवतीचा मृत्यू दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात निकाल लवकर लावला जाईल, तसेच कुटुंबातील एकास सरकारी नोकरीही दिली जाईल, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत होती. यावर देशमुखांनी प्रतिक्रिया दिली.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोपींना कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे.

आज सकाळी 6.55 मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. सकाळी दोनच्या सुमाराच पीडितेला ह्रद्यविकाराचा झटका आला होता. हिंगणघाट येथील मेडिकल बुलेटीनमध्ये डाॅक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-त्याला आम्ही जिंवत जाळू, त्या नराधमाला फक्त 10 मिनीटं आमच्या ताब्यात द्या; पीडितेच्या मामाची मागणी

-मी हिरोपेक्षा काही कमी नाही- अशोक चव्हाण

-“आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला; हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला”

-पुण्यात अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

-महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला; माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय- यशोमती ठाकूर