लेक आपल्याला सोडून गेली… आता नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- फडणवीस

मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असंही फडणवीस म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

दरम्यान, पीडितेच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पीडितेच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी दिली जाईल- अनिल देशमुख

-त्याला आम्ही जिंवत जाळू, त्या नराधमाला फक्त 10 मिनीटं आमच्या ताब्यात द्या; पीडितेच्या मामाची मागणी

-मी हिरोपेक्षा काही कमी नाही- अशोक चव्हाण

-“आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला; हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला”

-पुण्यात अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार