“आता शेलारांना काही कामच उरलं नाही म्हणून ते टिंगलटवाळगी करत सुटले आहेत”

मुंबई | आमदार आशिष शेलार यांना सध्या काही काम नाही. संपूर्ण भाजप बेकार आहे. त्यामुळे खिजवणं, चिडवणं, टिंगलटवाळगी करणं एवढंच काम त्यांना उरलं आहे, अशी बोचरी टीका परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे.

ठाकरे सरकारच्या काही निर्णयांवर शेलार यांनी ट्विटरवरून टीका केली होती. यालाच अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या गोष्टी समजत नाहीत त्यावर शेलारांनी बोलू नये, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

पोलिसांची तयारी नसतानाही नाइट लाइफचा निर्णय लादला, आता नुकसान सहन करून मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी ‘म्हातारीचा बुट’ हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं, अशी टिका शेलार यांनी केली होती.

दरम्यान, शेलार काय आणि एकूणच भाजप त्यांच्या डोक्यात ‘नाइट लाइफ’ म्हणजे अय्याशी आहे, ‘नाइट लाइफ’ ही अय्याशी नव्हे. आम्ही दारू, पब, वेश्या व्यवसायासाठी रात्री परवानगी दिलेली नाही, असंही परब यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या- 

-लोकेश राहूलने मोडला रनमशिन कोहलीचा ‘तो’ विक्रम

-केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

-मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहुद्या कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका

-अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल

-लज्जास्पद! कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं