लोकेश राहूलने मोडला रनमशिन कोहलीचा ‘तो’ विक्रम

मुंबई | न्युझीलंडविरूद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने पुन्हा सुपर विजय मिळवला. सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. सुपर ओव्हरमध्ये के. एल. राहुलने षटकार आणि चौकार मारत विजयाचा पाया रचला. याचदरम्यान राहुलने कर्णधार विराट  कोहलीचा विक्रम मोडला आहे.

लोकेश राहुलने टी-20 प्रकारात 4 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. केवळ 117 डावांमध्ये राहुलने ही कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराट कोहलीला 4 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 138 डाव खेळावे लागले होते.

के. एल. राहूलने पहिल्या टी-20 सामन्यापासून आपल्या आक्रमक फलंदाजीची धडाका चालू ठेवला आहे. कालच्या सामन्यात राहुलने 26 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने 39 धावा केल्या.

दरम्यान, नवीन वर्षात टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारताची सुरुवातही चांगली झालेली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहाही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

-मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहुद्या कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल

-लज्जास्पद! कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं

-“साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत, आमचं दुर्दैव की त्या आमच्याच पक्षात आहेत”