मुंबई | 8 मार्च रोजी आटकर विभागाने (Income Tax Department) मुंबईसह एकूण 26 ठिकाणी टाकलेल्या धाडी या मंत्री अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate), संजय कदम यांच्याशी संबंधित आहेत. तसंच या धाडीत मोठं घबाड सापडल्याचा दावा भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय.
आयकर विभागाच्या धाडीतून अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खरमाटे हे कोट्यवधींची रोकड, अपारदर्शक व्यावाकार आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये सहभागी असल्याचं आढळल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. तसंच ईडीनेही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी मागील दहा वर्षाच्या काळात पुणे, सांगली आणि बारामती येथील प्राइम लोकेशनमध्ये मालमत्तांच्या स्वरूपात प्रचंड संपत्ती खरेदी केल्याचं उघड झालं.
त्यांच्या कुटुंबाकडे पुण्यात एक बंगला आणि एक फार्म हाऊस, तासगावमध्ये एक भव्य फार्म हाऊस, सांगलीत दोन बंगले, तनिष्क आणि कॅरट या नामांकित ब्रँडची शोरूम आहेत.
दरम्यान, बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत असल्याचं समजतंय.
ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केलं असल्याचंही सोमय्या यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडावर
नवाब मलिकांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
काळजी घ्या! गेल्या 8 दिवसात 8 पटीने वाढलाय कोरोना; WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
31 मार्चच्या आधी ‘ही’ 5 कामं आटपून घ्या; नाहीतर मोठं नुकसान होईल