पुणे | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुण्याच्या शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केलं आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान दडलेलं आहे. आजही औरंगजेब नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातील मुस्लिम समाजाच्या रुपाने तो शत्रू हिंदू समाजाच्या पुढे उभा ठाकला आहे, असं ते म्हणाले.
देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात संभाजी महाराजांनी बलिदान पत्कारले पण धर्म सोडला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांना हाल-अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज हा खरा कारणीभूत आहे आणि तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे, असं भिडे म्हणालेत.
आपणही त्यांच्यापासून सावध राहून त्यांना हिंदू समाजामध्ये पोटतिडकीने झालेल्या बलीदानाचा सूड घेण्याची जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल, असा एक दिवस नक्की उगवेल. हीच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदुची छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी याआधीही देखील वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडावर
नवाब मलिकांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
काळजी घ्या! गेल्या 8 दिवसात 8 पटीने वाढलाय कोरोना; WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
31 मार्चच्या आधी ‘ही’ 5 कामं आटपून घ्या; नाहीतर मोठं नुकसान होईल
आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट