“तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना सैन्य दलात घेणार नाही”

नवी दिल्ली | अग्निपथ (Agnipath Scheme) संदर्भात देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली. मात्र लष्कराने रविवारी ही योजना मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रविवारी तिन्ही दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत (Press Conference) आता यातूनच सर्व भरती होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

आर्मीचे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निवीरांना सियाचीन आणि इतर क्षेत्रात सैनिकांना जशा सुविधा दिल्या जातात तशा सुविधा दिल्या जातील असं म्हटलं. सेवाशर्तींमध्ये देखील मतभेद केले जाणार नाहीत, असं ते म्हणाले.

आर्मीचे लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा, नौसनेकडून वाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दलाकडून एअर मार्शल सूरज झा उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलाचं सरासरी वय कमी करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय सैन्याचं सध्याचं सरासरी वय 32 वर्ष आहे. इतर देशांच्या सैन्य दलांचा अभ्यास करुन ते 26 वर्षांपर्यंत आणलं जाणार असल्याचं अनिल पुरी म्हणाले.

अनिल पुरी यांनी अग्निपथ योजनेतील अग्निवीर म्हणून काम करणाऱ्या जवानाचा मृत्यू झाल्यास त्याला 1 कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल असं म्हटलं. दरवर्षी भारतीय सैन्य दलातील 17 हजार 600 लोक कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती करत आहेत. ते सेवानिवृत्तीनंतर काय करतात याबद्दल कुणीचं विचारलं नसल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, ही योजना मागे घेण्याची विरोधकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र ही योजना मागे घेतली जाणार नसल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“काही खोटारडी लोकं मनाला वाटेल तसं बोलत असतात” 

“आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे”

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सशक्ततेच्या दिशेने वाटचाल”

विधानपरिषद निवडणुकीपुर्वी एकनाथ खडसे आणि राम शिंदेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी