“काही खोटारडी लोकं मनाला वाटेल तसं बोलत असतात”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 56व्या वर्धापनदिनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली असल्याचं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या स्थापनेनंतरच देशात प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेला सुरूवात झाली, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. शिवसेनेचीच भूमिका घेत इतर पक्ष स्थापन झाल्याचं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर खोचक शब्दात टीका केली आहे. काही खोटारडी लोकं मनाला हवं तसं बोलत असतात, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

शिवसेना स्थापनेच्या फार पूर्वीपासून दक्षिणात प्रादेशिक पक्ष स्थापन झाल्याचं नितेश राणे म्हणाले. यावेळी निलेश राणे यांनी तामिळनाडू राज्यातील DMK पक्षाचं उदाहरण दिलं.

DMK पक्ष 17 सप्टेंबर 1949 ला स्थापन झाला. त्यावेळी संज्याचा जन्मसुद्धा झाला नव्हता, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

सध्याचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या जीवावर चाललं आहे. प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवरच देशाचं राजकारण उभं असल्याचंही राऊत म्हणाले होते.

दरम्यान, संजय राऊतांच्या वक्त्यावरून निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे”

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सशक्ततेच्या दिशेने वाटचाल”

विधानपरिषद निवडणुकीपुर्वी एकनाथ खडसे आणि राम शिंदेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘या’ कारणामुळे साजरा करतात फादर्स डे, वाचा महत्त्व आणि इतिहास