नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाहसोहळ नुकताच पार पडला. मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याला राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती, मात्र आता या लग्नसोहळ्याला चार दिवस होत नाहीत तोच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ankita Patil Thackeray)

सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातला आहे. भारतातही सध्या अलर्ट जारी करण्यात आला आहे, महाराष्ट्रात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तर यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. मात्र असं असलं तरी ठाकरे-पाटील लग्नसोहळ्यात कोरोनानं शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केलं आहे.

ठाकरे-पाटील विवाहसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली होती. लग्न ठरण्याआधी यासंदर्भात चांगल्याच बातम्या प्रकाशित झाल्या. अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार असल्याच्या बातम्या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या.

मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. ठाकरे घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणं आहे तर दुसरीकडे पाटील घराण्याचंही राजकारणामध्ये वेगळं स्थान आहे. यामुळे या लग्नाची चांगलीच चर्चा होती.

दोन्ही राजकीय घराण्यांचा संपर्क दांडगा असल्याने राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. आता या सोहळ्यातील नवरी मुलगीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लग्नासारख्या समारंभामध्ये फोटो काढण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यातच नवरा-नवरीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही. अशावेळी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात नाही तसेच मास्क देखील लावला जात नाही. त्यामुळे कोरोना प्रसाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते.

आता अंकिता पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत, त्यामुळे अनेकांचं टेन्शन वाढलं आहे, त्यात ओमिक्रॉनसारखा नवा व्हेरियंट आल्यानं हा नक्कीच काळजी करण्यासारखा प्रकार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला 

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता 

‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ 

“…त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढलं”; द डर्टी पिक्चरबाबत विद्या बालनचा खुलासा