अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. वाईन विक्रीच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनीही आज टीका केली.

अण्णा हजारे म्हणाले, महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. असे निर्णय घेऊन राज्य सरकार राज्याला कुठे घेऊन जाणार आहे, असा प्रश्नही हजारे यांनी उपस्थित केला.

वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करण, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणं हे सरकारचे कर्तव्य आहे. असं असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचं पाहून दुःख होतं, असं ते म्हणालेत.

20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले.

यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटीवरून 250 कोटीवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचं समजं. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो असं हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नव्या वाईन विक्री धोरणाला परवानगी दिली आहे. नव्या वाईन पॉलिसीनुसार (new wine policy) आता किराणा दुकान आणि शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवता येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून टीका होत आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर (State Government) टीकेची झोड उठवली आहे. वाईनवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…” 

देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी 

भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर 

‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’; विक्रम गोखले भडकले