‘या’ ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा, खासगी वाहनांना देखील असणार बंदी

तिरूवनंतपुरम | गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. त्यातच आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केरळ सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

केरळमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. केरळ राज्यसरकाकडून एकदिवसीय लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सरकारने लॉकडाऊनमधून फक्त अत्यावश्यक सेवांनाच सुट दिली आहे.

केरळातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. या उच्चस्तरीय  बैठकीमध्ये 23 आणि 30 जानेवारीला फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन दरम्यान फक्त खासगी वाहनांना बंदी असणार आहे. ज्या प्रवाशांनी विमान तिकीट काढली आहे त्यांची चौकशी करून त्यांना विमानप्रवासाकरिता जाण्यास परवानगी असणार आहे.

शनिवारी केरळमध्ये 45 हजार 136 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यातच केरळातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा 55 लाख 74 हजार 702 इतका झाला आहे.

त्यातच  गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 लाख 37 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे देशभरात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे.

महाराष्ट्रातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पुणे जिल्हात ओमिक्रॉनचे रूग्ण सापडण्याचं प्रमाण अधिक आहे.

दिल्ली, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यातच केरळातील रूग्णसंख्या वाढत असल्याने केरळ राज्य सरकारने लॉ़कडाऊन जाहिर केला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  लसीकरणावरून एक वक्तव्य केलं आहे. कोरोना लसीची सक्ती नाही मात्र, दुसरा डोस विनंती करून घ्यायला भाग पाडू, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती

 अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण

“राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार”