“…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती

मुंबई | चित्रपट क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये शरद केळकरचा समावेश होतो. अनेक चित्रपटांमध्ये विविधअंगी भूमिका शरद केळकरनं साकारल्या आहेत.

राम लीला सिनेमातील शरद केळकरच्या भूमिकेसाठी सर्वस्तरातून नावाजण्यात आलं होतं. छोट्या पडद्यावरून काराकिर्दीची सुरूवात केलेल्या केळकरनी आपली छाप बाॅलिवूडमध्येही सोडली आहे.

शरदनं आपल्या अभिनयाच्या जोरवार अनेक भूमिका साकारल्या आहेत. तानाजी द अनसंग वाॅरिअर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वांना नावाजलं होतं. परिणामी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

शरदनं एका मुलाखतीत बाॅलिवूड चित्रपटांच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. सध्या बाॅलिवूड चित्रपटापेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा बाॅक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे.

सध्या देशातील लहान खेड्यापासून जगातील प्रसिद्ध शहरापर्यंत दाक्षिणात्य सिनेमा पुष्पा द राइजचा जलवा कायम आहे. पुष्पाच्या यशावर शरद केळकरनं आपली भूमिका मांडली आहे.

मला भीती वाटते की दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशामुळं बाॅलिवूडचं महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे, असं शरद म्हणाला आहे. आपण आपली मुळं विसरत आहोत. पुर्णपणे आपण दुसऱ्या झानमध्ये जात आहोत, असं केळकर म्हणाला आहे.

बाॅलिवूडकडून प्रेक्षकांना मसाला चित्रपट अपेक्षित आहेत. लोकांना काहीतरी वेगळं पाहण्याची अपेक्षा आहे. पण तसे चित्रपट सध्या तयार होत नाहीत, असं केळकर म्हणाला आहे.

लोकांना वेगळं पहायचं आहे मग आपल्यालाही काही वेगळं तयार करावं लागेल. जास्तीत जास्त व्यावसायिक अंगानं आणि अधिकाधिक मनोरंजनाच्या उद्देशानं चित्रपट तयार करण्यात यावेत, असंही केळकर म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण

“राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार” 

पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार