मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं

मुंबई | राणा दाम्पत्याला आणखी एक झटका बसला आहे. राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आली आहे. आता याची मुंबई महापालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे.

पालिकेच्या वांद्रे एच पश्चिम विभागाचे सहाय्यक विनायक विसपुते यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.

सदर इमारतीतील अनेक घरांमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्यातक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्यानुसार काही घरांना याआधीही नोटिसा पाठवल्या आहेत.

नोटीस राणा दाम्पत्याच्या घरालाही पाठवली आहे आणि घराची तपासणी करून आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत, असे विसपुते यांनी नमूद केलं आहे.

इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचं बांधकाम करण्यात आलं आहे, असं पालिकेचं म्हणणं आहे.

पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम 488 नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटीस पाठवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

संपूर्ण अभ्यास करूनच आपली मते मांडा- कुणाल टिळक 

पहिल्याच नजरेत पडाल प्रेमात; Hyundai ची शानदार कार लवकरच येणार बाजारात

काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई! 

“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?”