…अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मुलाखतीेंचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. त्यातच आता एका न्यूज अँकरने मुलाखती दरम्यान एका तेलगू अभिनेत्याला न्यूजरूममधून बाहेर काढले आहे.

लोकप्रिय तेलगू अभिनेता विश्व सेन सोमवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या न्यूजरूममध्ये गेला होता. मात्र, अँकर आणि विश्वसेनमध्ये वाद झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टीव्ही अँकर देवी नागवल्ली विश्वसेनला गेट आऊट, गेट आऊट, असं बोलताना दिसत आहे. हैदराबाद येथील न्यूज स्टुडिओत हा प्रकार घडला आहे.

न्यूज अँकरने विश्वसेनचा पागल सेन असा उल्लेख केला. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये  विश्वसेनचा एक हताश झालेला व्यक्ती, अशा शब्दांमध्ये उल्लेख केला आहे.

अपमानास्पद वागणूक दिल्याने विश्वसेन संताप अनावर झाला आहे. विश्व सेनच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे. चाहत्यांनी उद्धटपणे वागल्यामुळे अँकरचा चांगलाचं समाचार घेतला आहे.

माझ्यावर वैयक्तिकपणे बोलण्याचा कुठलाही अधिकार अँकरला नाही. तुझी जीभ तुझ्या ताब्यात ठेव आणि मला हिनवण्याचा प्रयत्न करू नकोस, असे अभिनेत्याने म्हटलं आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याला पाठिंबा दर्शविला आहे. कॅमेऱ्यासमोर अपमानास्पद वागणूक देणे अतिशय असभ्य वर्तन आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडिओ-  

महत्त्वाच्या बातम्या- 

“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप

 “अहो आदित्यजी अशा घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे इतिहास….”

“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

 सर्वांत मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!