राजकीय गोंधळ!… अन् छगन भुजबळांना आली RRR चित्रपटाची आठवण

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. औरंगाबाद येथील सभा प्रकरणी राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

औरंगाबदमध्ये सिटी चौक पोलीस स्थानकात ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी यावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे.

औरंगाबाद येथील सभेबाबत पोलीस कायद्याप्रमाणं निर्णय घेत आहेत, असं सांगताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी भाषण तपासलं आहे. या भाषणातून राज ठाकरेंनी अतीशय भडकवणारं आणि धार्मिक तेढ निर्माण करणारं भाषण केल्याचं समोर आलं आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

पोलीस कायद्याप्रमाणं काम करत आहेत. त्यानंतर न्यायपालिका आपलं काम करत असते. हे सर्व रूटीन प्रमाणात चालू आहे, असं म्हणत भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंच्या प्रकरणावर बोलताना भुजबळांनी राणे आणि राणा यांना देखील घेरलं आहे. राज, राणे आणि राणा म्हणजे आरआरआर चित्रपट आहे, अशी खोचक टीका भुजबळांनी केली आहे.

नोटीस येणार याबाबत राज ठाकरेंनी मानसिक तयारी केली आहे, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. भुजबळांनी राणा दाम्पत्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत कायदा सर्वांना समान असल्याचं सुचवलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राज्यभरात मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात येत आहेत. परिणामी राज्य गृह खात्यात मोठ्या हालचाली होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

 सर्वांत मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं 

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना अटक होणार?, महत्त्वाची माहिती समोर