शिवसेनेला झटका! शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतरही शिवसेनेची गळती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

अगदी कालपर्यंत शिवसेनेत असलेले आमदार आज शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झालेले पाहायला मिळत आहे.

शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस मोठं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावर कायम ठेवल्याने शिवसेनेला आणखी एक झटका बसला.

बांगर यांनी अचानक घेतलेल्या यू-टर्नमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यात आता शिंदे गटातील आमदारांची संख्या 40 च्या पुढे गेल्याने शिवसेनेचं टेंशन वाढलं आहे.

एकिकडे बहुमत चाचणीला सुरूवात झाली असताना बांगर यांच्यामुळे शिवसेनेला झटका बसला आहे.

दरम्यान, शिंदे गटाविरोधातील मोर्चातही बांगर सहभागी होते. मात्र, त्यांनी अचानक यू-टर्न घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बुद्धीला विचारून एकदा सांगा की खरंच समाधान झालं आहे का?’; अजित पवारांनी भाजप नेत्यांना डिवचलं

मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

सर्वात मोठी राजकीय बातमी, शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील

“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”

उद्धव ठाकरे आक्रमक; शिंदेंनंतर ‘या’ बड्या नेत्याची केली शिवसेनेतून हकालपट्टी