मोठी बातमी! शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई | 10 दिवसांच्या सत्तासंघर्षावर पडदा पडला आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं तरी त्यांच्यासमोर बहुमत चाचणीचं आव्हान कायम होतं. अखेर बहुमत चाचणीत भाजप व शिंदे गटाला बहुमताचा आकडा पार करण्यात यश आलं आहे.

शिंदे सरकारनं बहुमत चाचणीत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. भाजप व शिंदे गटाला बहुमत चाचणीत 164 मतं मिळाली आहेत.

एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता शिंदे गट व भाजप बहुमत चाचणीत देखील पास झालं आहे.

सपाच्या अबू आझमींनी आजही तटस्थ भूमिका घेतली. शिंदे गटाने 164 मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला तर महाविकास आघाडीला 99 मतं पडलेली पाहायला मिळाली. त्यात 3 आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली.

दरम्यान, शिंदे गटाने बहुमताचा आकडा पार करत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमतापेक्षा जास्त मतं शिंदे गट व भाजपला मिळाल्याने नवनिर्वाचीत सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेला झटका! शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

बुद्धीला विचारून एकदा सांगा की खरंच समाधान झालं आहे का?’; अजित पवारांनी भाजप नेत्यांना डिवचलं

मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

सर्वात मोठी राजकीय बातमी, शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील

“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”