“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त घोषणेमुळे त्यांना मंगळवारी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री सी. टी. रवी यांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं.

देशद्रोहींना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत, असं वक्तव्य रवी यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मी अनुराग ठाकूर यांच्याबरोबर आहे. देशद्रोहींविरोधातील वक्तव्याबद्दल अनुराग ठाकूर यांच्यावर टीका करणारे हे तेच लोक आहेत, ज्यांनी दहशतवादी अजमल कसाब आणि याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता, असं म्हणत सी. टी. रवी यांनी ट्विटरवर हॅशटॅग वापरला आहे.

दरम्यान, तुकडे-तुकडे गँगच्या पाठिंब्यावर सीएएबद्दल देशात खोटी माहिती पसरवली जात आहे. देशद्रोह्यांना बिर्याणी नाही तर गोळ्या घातल्या पाहिजेत, असं सी. टी. रवी म्हणाले आहेत. अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपचे 200 खासदार, 70 मंत्री अन् 11 मुख्यमंत्री दिल्लीच्या प्रचाराला- अरविंद केजरीवाल

-राज ठाकरेंचा एकमेव आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

-नवरा देशासाठी शहीद झालाय आणि मुलीला शाळेत साधा प्रवेश मिळत; वीरपत्नीची खंत

-भीमा-कोरेगावचा हिंसाचार घडवून आणण्यामागे फडणवीस सरकारचाच हात- नवाब मलिक

-सलाईनच्या बाटलीत शेवाळ; सरकारचाच जर असा पुरवठा… तर रूग्णांनी काय करावं?