“अरविंद केजरीवाल हे दहशतवादीच आहेत”

नवी दिल्ली | दिल्लीमधील विधानसभेची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसं नेत्यांमधील शाब्दिक युद्ध रंगत चाललं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादीच असल्याचं भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी म्हटलं आहे.

दहशतवादी आणि नक्षलवादी ज्याप्रमाणं देशाचं नुकसान करतात. रस्त्यांची नासधूस करतात. सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात, तेच काम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत, असं  वर्मा यांनी म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाहीन बागमधील आंदोलन संपवावं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रवेश वर्मा यांनी शाहीन बागची तुलना काश्मीरशी केली होती.

दरम्यान, शाहीन बागमधील आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मला फोनवरून धमकी मिळाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असं ट्विट करत वर्मा यांनी माहिती दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”

-भाजपचे 200 खासदार, 70 मंत्री अन् 11 मुख्यमंत्री दिल्लीच्या प्रचाराला- अरविंद केजरीवाल

-राज ठाकरेंचा एकमेव आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

-नवरा देशासाठी शहीद झालाय आणि मुलीला शाळेत साधा प्रवेश मिळत; वीरपत्नीची खंत

-भीमा-कोरेगावचा हिंसाचार घडवून आणण्यामागे फडणवीस सरकारचाच हात- नवाब मलिक