सरकार अजूनही चीनकडून पीपीई, मास्क का घेतंय?- अनुप सोनी

मुंबई | कोरोना विषाणूचा फैलाव वुहानमधून झाल्यामुळे चीनमधून आयातीवर बहिष्कार टाका, अशी मागणी देशभरात जोर धरु लागली आहे. ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेता अनुप सोनी यानेही सरकार अजूनही चीनकडून पीपीई, मास्क का घेतंय?, असा सवाल विचारला आहे.

लोक म्हणत आहेत चीनवर बंदी घाला, चिनी वस्तूंच्या निर्यातीवर बहिष्कार टाका. ही मागणी होत असतानाच सरकार अजूनही चीनकडून मोठ्या प्रमाणावर पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर सारख्या उपकरणांची खरेदी करत आहे. ही गोष्ट माझ्या पचनी पडतच नाहीये, असं अनुप सोनीने म्हटलं आहे.

अनुपने ट्विटरवर आपली भूमिका मांडल्यानंतर अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.कोरोना विषाणूने भारतासह जगभरात थैमान घातलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी भारतातही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळलं; भारतापेक्षा पाकला जास्त मदत

-“आंबेडकरी शक्तीला, तरुणांना भावनिक बनवून, भडकविण्याचे प्रयत्न काही वर्षांपासून सुरु आहेत”

-बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जमा केलेला निधी आपण दुर्बल घटकांसाठी वापरूयात- प्रकाश आंबेडकर

-देशात लॉकडाऊन, मात्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींच्या मुलाचा लग्नसोहळा थाटामाटात

-MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द