अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळलं; भारतापेक्षा पाकला जास्त मदत

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधं मिळवलं. त्यासाठी भारताला या औषधावरील निर्यात बंदी उठवावी लागली.

जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढवल्यानंतर अमेरिकेने जगातील अनेक देशांना आरोग्य सहाय्यता निधी जाहीर केला आहे. अमेरिकेच्या परदेश मंत्रालय आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने आपातकालीन स्वास्थ, आर्थिक सहायता करता 508 मिलियन डॉलर खर्च करणार आहे.

भारताला आरोग्य सहाय्यता निधी म्हणून अमेरिकेने 5.9 मिलियन डॉलरची मदत केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला 9.4 मिलियन डॉलर ची मदत केली आहे. यावरून अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळल्याचं दिसून आलं आहे.

अमेरिकेने भारतासह अफगाणिस्तानला 18 मिलियन डॉलर, बांग्लादेश 9.6 मिलियन डॉलर, भूतानला 5 लाख डॉलर, नेपाळला 1.8 मिलियन डॉलर, आणि श्रीलंका 1.3 मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आंबेडकरी शक्तीला, तरुणांना भावनिक बनवून, भडकविण्याचे प्रयत्न काही वर्षांपासून सुरु आहेत”

-बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जमा केलेला निधी आपण दुर्बल घटकांसाठी वापरूयात- प्रकाश आंबेडकर

-देशात लॉकडाऊन, मात्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींच्या मुलाचा लग्नसोहळा थाटामाटात

-MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द

-“वाटलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वांना समान न्याय भेटेल पण…”