अनुराग कश्यपवर बला.त्काराचा आ.रोप झाल्यानंतर अनुरागच्या दोन्ही पूर्व पत्नींनी सोडलं मौन म्हणाल्या…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणच लागलं आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पडद्याआड चालणाऱ्या अनेक गोष्टी हळूहळू समोर येवू लागल्या आहेत. नुकतंच अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप केला आहे. पायल घोषनं केलेल्या आरो.पानंतर अनुराग कश्यप यांच्याविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत, अशातच आता अनुराग कश्यपच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी त्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.

अनुराग कश्यपच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी म्हणजेच कल्की केकला आणि आरती बजाज यांनी अनुरागची पाठराखण केली आहे. या दोघींनी अनुरागच्या समर्थनार्थ इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिल्या आहेत. यामध्ये आरती आणि कल्की या दोघींनी आपण अनुराग सोबत असल्याचं सांगितलं आहे.

अभिनेत्री पायल घोषनं अनुरागवर केलेला लैं.गिक शो.षणाचा आ.रोप म्हणजे एक घाणेरडा स्टंट आहे. अनुराग तू खऱ्या अर्थानं रॉकस्टार आहेस. महिलांच्या सबलीकरणासाठी तू जे काम करत आहेस ते तुझे काम निरंतर चालूच ठेव. या जगात प्रामाणिकपणा उरलेला नाही, असं आरती बजाजनं अनुरागच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच आरतीनं या पोस्टमध्ये अनुराग कश्यप यांच्यावर आ,रोप करणाऱ्या लोकांवरही निशाणा साधला आहे. हे जग पराभूत झलेल्या लोकांनी भरलेलं आहे. या जगातील अनेक लोक इतरांचा द्वे.ष करण्यासाठी आपली उर्जा वाया घालवतात. इतरांचा द्वे.ष करण्यात व्यर्थ जाणारी उर्जा जर योग्य ठिकाणी वापरली तर हे जग आणखी उत्तम दिसेल, असं म्हणत आरतीनं अनुरागवर आ.रोप करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला आहे.

तसेच अनुरागची दुसरी पत्नी कल्की केकलानंही अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. अनुराग महिलांच्या स्वातंत्र्यासाठी तू तुझ्या चित्रपटाच्या माध्यमातून ल.ढा दिला आहेस. त्यांची अखंडता अबाधित राखण्यासाठी तू खासगी  आणि व्यवसायिक अशा दोन्ही आयुष्यात लढला आहेस, असं कल्कीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच अनुराग तू घटस्फो.टानंतरही मला आधार दिला आहेस. सोशल मीडियावर सध्या तुझ्यावर चालू असणाऱ्या आ.रोप प्रत्या.रोपाच्या सत्राचा स्वतःवर काहीही परिणाम होवू देवू नकोस, असं कल्कीनं या पोस्टमधून अनुरागला सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

@anuragkashyap10

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत ड्र.ग्जचे हेवी डोस का घेवू लागला होता? रियानं केला धक्कादायक खुलासा!

“शेतकऱ्यांना दह.शतवादी म्हणणारी झाशीची राणी शेफारली आहे, कंगनानं आणि भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी”

“अनुरागनं मला त्यावेळी अडल्ट फिल्म दाखवली अन् माझ्यासमोर कपडे काढत मलाही…”

‘अनेक हिरोंनी माझ्यासोबतही…’; कंगनानं सांगितली चित्रपट सृष्टीची काळी बाजू

‘सुशांतला ‘या’ कारणानं रिया चक्रवर्तीची भीती वाटत होती’; सिद्धार्थनं केला धक्कादायक खुलासा!