म्हणुन… अ‍ॅपलचे आयफोन्स एकापेक्षा जास्त खरेदी करता येणार नाहीत

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा वेगाने होणारा संसर्ग पाहून अ‍ॅपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. जर युजर्स एकावेळी एकापेक्षा अधिक आयफोन घेण्याचा विचार करत असतील तर त्यांना आता असं करणं शक्य होणार नाही. कारण अ‍ॅपलने अमेरिका आणि चीन व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये एका युजरला दोन पेक्षा जास्त आयफोन खरेदी करता येणार नसल्याचं सांगितलं आहे.

कंपनीने कोरोनामुळे कमी उत्पादन आणि चीनबाहेर असलेले स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी अ‍ॅपलने आपले स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अ‍ॅपलच्या काही आयफोन्सच्या ऑनलाईन विक्रीवर दोन पेक्षा जास्त फोनची खरेदी करता येणार नाही. यामध्ये iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone XR, iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max चा समावेश आहे. तसेच आयफोन्ससोबतच अन्य काही अ‍ॅपल उत्पादनासाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पेट्रोलपंप आजपासून राहणार अर्धावेळ बंद

-अमेरिका ते भारत… ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असलेल्या अमेय वाघचा चित्तथरारक अनुभव

-“ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलंच नाही.”

-उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार!; कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

-“देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या”