देश

शपथविधीसाठी अरविंद केजरीवालांचं मोदींना निमंत्रण

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल रविवारी( 16 फेब्रुवारी) मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे.

आपचे नेते अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलिला मैदानावर सकाळी दहा वाजता हा सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचाच वरचष्मा असेल असं अनेक एक्झिट पोलमधून सांगण्यात आलं होतं. अपेक्षेप्रमाणे आपने निवडणुकीत यश मिळवत 62 जागा काबिज केल्या आहेत. मागीलवेळी आपच्या पारड्यात दिल्लीकरांनी 67 जागा टाकल्या होत्या.

भाजपला दिल्ली निवडणुकीत चांगल्या यशाची अपेक्षा होती. मात्र, भाजपला 8 जागांवर समाधान मानावं लागलं, गेल्या निवडणुकीत भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे पक्षाच्या जागा वाढल्या असल्या तरी म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.

महत्वाच्या बातम्या- 

-कार्यकर्त्यांनो थोडं दमांनं घ्या; …नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार

-व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाण रंगले प्रेमरंगात; ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गायलं गाणं

-शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारली जाणार; अजित पवारांची घोषणा

-शंकररावांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप विलासराव देशमुखांनी केलं होतं- अशोक चव्हाण

-पवारसाहेबांकडे पाहिल्यावर वाटतं… यांच्यासारखं काम करता यायला पाहिजे- अशोक चव्हाण