“मर्द आहात ना?…”, नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद सर्वांना माहिती आहे. अनेकदा आमने-सामने दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. अशातच नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात सरकार आहे, असं वाटत नाही. सत्तेत असणारा पक्षच मुंबईतील वातावरण बिघडवत आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत. तुम्ही असं केलं तर स्मशानात पाठवू असं वक्तव्य केलं जातंय, हा गुन्हा होत नाही का?, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

घरातून बाहेर पडू देणार नाही असं म्हणणं हा गुन्हा नाही का? अमरावतीवरून नवनीत राणा मुंबईत आल्या, त्यावेळी शिवसेना झोपली होती का?, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.

पोलिसांनी हस्तक्षेप करून राणा कुटुंबाला जाऊ द्या, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. जर त्यांना कुणी अडवलं, जाऊ दिलं नाही तर मी काही वेळाने स्वत: नवनीत राणांच्या घरी जाणार, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

बघुया कोण येतं तिकडे. मर्द आहात ना? या म्हणावं तिकडे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल उपस्थित होतोय, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये”

शेवटच्या ओव्हरला राडा! कुलदीप मैदान सोडून निघाल्यावर युझीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

समान नागरी कायद्यावर गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“बंटी आणि बबलीने पळ काढला, तुम्ही पळपुटे आहात”

मोठी बातमी! अखेर राणा दाम्पत्याचं आंदोलन मागे; दिलं ‘हे’ महत्त्वाचं कारण