“…म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये”

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्ववाची भूमिका प्रखरपणे मांडल्यानंतर आता राज्यातील राजकारणाला भगवा रंग चढल्याचं पहायला मिळत आहे. अशातच येत्या महाराष्ट्र दिनाला म्हणजेच 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे.

राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांचा सात्त्याने विरोध केला आहे. रामदास आठवले यांनी राज ठाकरे आणि भाजपच्या युतीवर नाराजी व्यक्त केली होती. अशातच आठवले यांनी पुन्हा विरोध दर्शविला आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये. तिकडे मुस्लिम समाज जास्त आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सभेला परवानगी दिली तर राज ठाकरे राज्यात वाद निर्माण करत फिरतील, असंही आठवले म्हणाले आहेत.

मनसे भाजपमध्ये रिपाईची जागा घेणार नाही. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपने सोबत घेऊ नये, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच नाव सुचवलं होतं, पण त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका देखील रामदास आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्याला केलेला विरोध चुकीचा आहे. भोंगे काढण्यास आमचा विरोध आहे. राज ठाकरे यांनी धमकीची भाषा करू नये, असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेवटच्या ओव्हरला राडा! कुलदीप मैदान सोडून निघाल्यावर युझीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

समान नागरी कायद्यावर गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“बंटी आणि बबलीने पळ काढला, तुम्ही पळपुटे आहात”

मोठी बातमी! अखेर राणा दाम्पत्याचं आंदोलन मागे; दिलं ‘हे’ महत्त्वाचं कारण

“उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”