मुंबई | आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता असते. कदाचित त्यामुळेच सोशल मीडियावर सेलिब्रिटींची अफाट लोकप्रियता पाहायला मिळते.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींंचे अनेक फॉलोअर्स असतात. काही चाहते सेलिब्रिटींवर प्रेमाचा वर्षाव करतात पण तरी त्यांना अनेकदा ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागतो.
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. अर्जुन आणि मलायकाने अगदी त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा केल्यापासून ते दोघं वेळोवेळी ट्रोल होतात.
मलायका अर्जुनपेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठी आहे. मलायका आणि अर्जुनमधील या वयातील अंतरामुळे त्या दोघांना नेहमी ट्रोल केलं जातं. ट्रोल करणाऱ्या या लोकांना अर्जुन कपूरने फटकारलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना अर्जुन कपूरने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘आपण अशा समाजात राहतोय जो वेळेनुसार प्रोग्रेसिव्ह होत नाहिये’, असं म्हणत अर्जुनने ट्रोलर्सला सुनावलं आहे.
‘जेव्हा तुम्ही रिलेशनमध्ये असतो तेव्हा वयातील अंतराचा विचार करू नये’, असं अर्जुन कपूर एका मुलाखतीत बोलताना म्हणाला. सध्या अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाच्याही सोशल मीडियावर भरपूर चर्चा रंगत आहेत.
‘माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन’, असं अर्जुन कपूर लग्नाच्या चर्चांबद्दल बोलताना म्हणाला.
अर्जुन आणि मलायका सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अर्जुनने मलायकासाठी खास रोमँटिक डेटचं आयोजन केलं होतं. या डेटचे फोटोजही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खानने लग्नाच्या 19 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा मुलगा देखील आहे.
महत्वाच्या बातम्या-
विशाल निकम ठरला ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता; ट्रॉफीसह जिंकले ‘इतके’ लाख
“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो”
नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण