‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध!

मुंबई | संपूर्ण देशात ओमिक्रॉन आणि कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतली स्थिती आणखी चिंताजनक आहे. कारण दिल्लीत मागील काही महिन्यातील मोठी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे.

लोक वेळीच सतर्क झाले नाहीत तर जानेवारीत दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अशात अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासातून कोरोनासंदर्भातली धक्कादायक माहिती समोर आलीये.

अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आलं आहे की, काही दिवसांतच कोरोना व्हायरस मानवी शरीरातील मेंदू, हृदय आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

जिथे हा व्हायरस अनेक महिने राहू शकतो. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी (US Researchers) शरीरात आणि मेंदूमध्येय या व्हायरसचं वितरण आणि उपस्थिती यांचा व्यापक आढावा घेतला आहे.

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, त्यांच्या अभ्यासाना आत त्यांढळून आलं की हा व्हायरस श्वसन प्रणाली व्यतिरिक्त रोगजनक मानवी पेशींमध्ये प्रतिकृती तयार करण्यास सक्षम आहे.

शास्त्रज्ञांच्या एका गटाने दावा केला आहे की SARS-Cov-2 RNA शरीराच्या अनेक भागांमध्ये राहू शकतो, ज्यामध्ये मेंदूसंबंधित सर्व भागांचा समावेश आहे, जिथे तो 230 दिवस राहू शकतो आणि संसर्ग होऊ शकतो.

मेरीलँड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये हे संशोधन करण्यात आलं आहे.  या अभ्यासाचे निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आले, जे जर्नल नेचरमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो” 

नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे 

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींनी दिला ‘हा’ नारा