अर्णव गोस्वामिंच्या अडचणीत वाढ! न्यायालयाने ‘या’ कारणाने गोस्वामिंविरोधात उचललं कठोर पाऊल

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अ.टक केलं होतं. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना अर्णव गोस्वामींनी आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा आरोप अर्णव यांच्या कुटुंबाने केला होता. यानुसार कलम 306 अंतर्गत अर्णव गोस्वामी यांच्यावर गु.न्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना ता.ब्यात घेतलं होतं.

मात्र, सुप्रीम कोर्टाने अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. यामुळे अर्णव गोस्वामी कारागृहातून बाहेर आले होते. या प्रकरणी आता अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

अन्वय नाईक प्रकरणी 6 तारखेला झालेल्या सुनावणीला अर्णव गोस्वामी यांच्यासह तीनही आ.रोपी गैरहजर होते. यामुळे अलिबाग न्यायालयाने याप्रकरणी 10 तारखेला होणाऱ्या सुनावणीला तीनही आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या सुनावणीला हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णव गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते.

मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णव गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते. यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली.

नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. यामुळे नाईक कुटुंबियांवर मोठं दुःख ओढवलं होतं. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या –

भाजपला झटके सुरूच! आणखी एका बड्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

अबब… सोनं आतापर्यंत 9 हजार रुपयांनी स्वस्त; तज्ज्ञांनी दिलाय धक्कादायक इशारा

शिल्पा शेट्टीचे अक्षय कुमारवर अत्यंत धक्कादायक आरोप, व्हिडीओ व्हायरल

सुंदर दिसण्याच्या नादात ‘या’ अभिनेत्रीनं नाकाची लावली वाट; एकदा पहाच

बाॅलीवूडमध्ये येण्यापूर्वी अभिषेक बच्चन करायचा ‘हे’ काम; जाणून घ्या, अभिषेकच्या करिअरविषयी