जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक

मुंबई | शिवसेना नगरसवेकाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या शिक्षेविरोधात आता डॅडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आर. भानुमती आणि ए. एस बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी सुरू असून कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितलं. गवळीला दिलेली जन्मठेपेची शिक्षा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

अरूण गवळी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं होतं. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरूण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या- 

-पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड

-आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; चव्हानांनी घेतला आव्हाडांचा समाचार

-इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात…

-ऐसे कैसे चलेगा खानसाब?; पुणे पोलिसांचं ट्विट

-सतास्थापनेचे शिलेदार खासदार संजय राऊत सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच गेले मंत्रालयात